संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ह्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व पालखी मार्गावर पालखीचा पारंपरिक विसावा असलेल्या पुण्यभूमीच्या शेजारी मी ४ वर्षांपूर्वी विसावा नावाने उपहारगृह सुरु केले व त्या अंतर्गत मिसळचा तुतारी ब्रॅण्ड विकसित केला....मिसळ खायची आवड होतीच.. माझी पत्नी सौ.ऋतुजा व मी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या मिसळ चाखून बघीतल्या... काही ठिकाणी अप्रतिम चवीची मिसळ चाखायला मिळाली तर काही ठिकाणी नुसता फाफटपसारा, म्हणजे मिसळी बरोबर जिलेबी,गुलाबजाम,उगाचच ताट आणि पोट भरायला पाहिजे म्हणून ४/५ वाट्या देउन त्यात शेव मटकी,बुंदी,काकडी गाजराचे तुकडे द्यायची आणि मुळ रश्याला चवच नाही. फार निराशा झाली...असो.
पण आपण जेव्हा मिसळ तयार करुन ग्राहकांना देणार तर ती मिसळ चविष्ट तर पाहिजेच तसेच मिसळ खाऊन ग्राहक तृप्त ही झाले पाहिजेत ह्या हट्टाने त्यावर काम सुरू केले व १४ महिन्याच्या प्रयोगा नंतर आमची " तांबड्या मातीतील रांगडी कोल्हापूरी झणझणीत तुतारी मिसळ" मिसळ तयार झाली...आम्ही ताटात भरलेली मिसळ,२पाव कांदा लिंबू व रस्सा बस एवढंच देतो.बाकी कोल्हापूर सोडून इतर ठिकाणी मिळणारी कोल्हापूरी मिसळ म्हणजे निव्वळ तिखट जाळ! पण आमच्या तुतारी मिसळ मधे आपल्याला नुसता तिखटपणा न जाणवता,जाणवेल ती पारंपारीक कोल्हापुरी तांबड्या मातीतील रांगडी चव.
तुतारीच नांव का?
तुतारी ह्या वाद्याच्या नावानेच कुतूहल जागे होतं कारण युद्धाला तोंड फुटत असतांना किंवा राजे महाराजे यांच्या आगमना प्रसंगी तुतारी वाजवली जाई.ह्या वाद्याच्या सुरातून काही संकेत मिळतात,उपस्थिताचे लक्ष आपल्या आवाजाच्या दिशेने वेधून घेण्याची कमालीची ताकत ह्या वाद्यात आहे..हे वाद्य वाजवणे येर्यागबाळ्याचे काम नाही... मनगटात जोर छातीत दम असावा लागतो.तरच त्यातून योग्य सुर बाहेर येतात..वाद्य वाजवण्याचा सहजपणे प्रयत्न करणारे सुध्दा कधी तुतारीच्या वाटेला जात नाहीत..असंच काहीसं आमच्या बाबतीत ह्या १४ महिन्यात झालं होतं पण "एक तुतारी द्या मज आणून,फुंकीन मी ती स्वप्राणाने!" ह्या कवी केशव सुताच्या काव्या प्रमाणेच..आम्ही विविध मसाले वापरून आमची मिसळ तयार केली.. त्यामुळेच मिसळला "तुतारी" हे नाव आम्हाला योग्य वाटलं व आमची मिसळ तुतारी ह्या ब्रॅन्ड खाली रजिस्टर करुन विक्रीस सुरुवात केली.
आमच्या मिसळीची वैशिष्ट्ये
1) पारंपारीक कोल्हापुरी मसाले वापरुन घरी तयार केलेल्या मिसळ मसाल्याचा वापर.